ROHIT SHARMA : रोहित शर्माने वर्ल्ड रेकॉर्डसह रचला इतिहास, क्रिकेट विश्वातील ठरला पहिलाच खेळाडू...

गयाना : रोहित शर्माने पुन्हा एकदा धमाकेदार फटकेबाजी करत सर्वांची मनं जिंकली. रोहितने हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. रोहितने या सामन्यात दमदार कामगिरीसह वर्ल्ड रेकॉर्डसह इतिहास रचला आहे. क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा रोहित हा पहिलाच खेळाडू ठरलाा आहे.

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात ९२ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या सामन्यातही रोहितने तुफानी फटकेबाजी केली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस पडल्यानंतर जेव्हा गोलंदाजांसाठी पोषक खेेळपट्टी होती. विराट कोहली आणि ऋषभ पंत लवकर बाद झाले असताना रोहित शर्माने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि अर्धशतक झळकावले. रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावरच भारताला प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा करता आल्या. रोहितने यावेळी अर्धशतकासह एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

रोहित शर्माने यापूर्वी विराट कोहलीला पिछाडीवर सोडले होते. आता तर रोहितने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही मागे टाकले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ४२०० धावांचा पल्ला गाठणार रोहित शर्मा हा आता क्रिकेट विश्वातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. कारण आतापर्यंत क्रिकेट विश्वात एवढ्या धावा कोणत्याही फलंदाजाला करता आलेल्या नाहीत. टी-२० क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर आता टी-२० क्रिकेटमधी सर्वाधिक धावा आहेत. कारण बाबर आझमच्या नावावर ४, १४५ धावा आहेत. पण रोहित आता त्याच्यापुढे निघून गेला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. पण विराट आणि रोहिमध्ये आता जवळपास १०० धावांनी पुढे आहे.

रोहित शर्मा हा सातत्याने दमदार धावा करत असल्याचे समोर आले आहे. कारण गेल्या दोन्ही सामन्यांत रोहितने दमदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारताला विजय मिळवता आले. रोहितचे ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात ८ धावांनी शतक हुकले होते. त्यानंतर रोहितने इंग्लंडच्या सामन्यात ५७ धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळे आता रोहित अंतिम फेरीत किती धावा करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण भारतासाठी हा सामना सर्वात महत्वाचा असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-27T20:35:43Z dg43tfdfdgfd