T20 WC 2024 : वर्ल्ड कप भारताने तर मनं आनंद महिंद्रांनी जिंकली, भावनिक व्हिडिओसह चाहत्यांना रडवलं...

नवी दिल्ली : भारताने ट २० वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत. भारताच्या विजयानंतर आनंद महिंद्रा यांची एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये महिंद्रा यांनी एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर चाहत्यांच्या डोळ्यातून पाणी आल्यावाचून राहणार नाही.

आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ भारताच्या विजयानंतरचा आहे. जय शाह यांनी रोहित शर्माच्या हाती वर्ल्ड कप सुपूर्द केला आणि त्यानंतर भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. रोहितनंतर भारताच्या अन्य खेळाडूंनी वर्ल्ड कप हातात घेतला आणि जोरदार सेलिब्रेशन केले. भारताच्या सर्व खेळाडूंनी वर्ल्ड कपबरोबर फोटो काढला. त्यावेळी राहुल द्रविड मैदानात आले होते आणि ते खेळाडूंना भेटत होते. पण राहुल द्रविड यांच्या हाताला वर्ल्ड कपचा स्पर्ष मात्र झाला नव्हता.

द्रविड हे खेळाडूंबरोबर उभे होते. त्यावेळी विराट कोहली आला आणि त्याने द्रविड यांच्या हातात वर्ल्ड कप दिला. त्यानंतर द्रविड यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. पण महिंद्रा फक्त यावर थांबले नाहीत तर त्यांनी या व्हिडिओवर सुंदर वाक्य लिहिलं आहे. महिंद्रा यांनी लिहिलं आहे की, " आयुष्य असो किंवा क्रिकेट, ते गुरुच्या आशिर्वादाशिवाय जिंकलं जाऊ शकत नाही. गुरुपौर्णिमेपूर्वीच भारतीय खेळाडूंनी आपले गुरु द्रविज यांना गुरुदक्षिणा दिली आहे."

आनंद महिंद्रा हे क्रिकेटप्रेमी असल्याचे सर्वश्रृत आहे. कारण आतापर्यंत त्यांनी भारतीय खेळाडूंना आपल्या गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत. पण आता भारताच्या विजयानंतर आनद महिंद्रा यांनी आता एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे आणि ती चांगलीच व्हायरल झाली आहे. कारण या पोस्टमधला व्हिडिओ लोकांना भावूक करत असल्याचे समोर येत आहे.

भारताने वर्ल्ड कप जिंकला. पण राहुल द्रविड यांचे योगदानमात्र कोणीही विसरून चालणार नाही. आनंद महिंद्रा यांनी हीच गोष्ट आपल्या पोस्टच्या माध्यमातून सर्वांना सांगितली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-30T13:01:34Z dg43tfdfdgfd