दिल्ली कॅपिटल्सच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचं वर्चस्व, ६७ धावांनी दिली मात

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या चालू मोसमात सनरायझर्स हैदराबादने सलग चौथा विजय मिळवला आहे. शनिवारी, संघाने ३५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ६७ धावांनी पराभव केला. या विजयासह सनरायझर्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने २० षटकांत ७ गडी गमावून २६६ धावा केल्या. संघाने हंगामात तिसऱ्यांदा २५० हून अधिक धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १९.१ षटकांत सर्वबाद १९२ धावांवर आटोपला.

एसआरएचचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने ३२ चेंडूत ८९ धावा केल्या, तर अभिषेक शर्माने १२ चेंडूत ४६ धावा केल्या. शाहबाज अहमदने नाबाद ५९ आणि नितीशकुमार रेड्डीने ३७ धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या. अक्षर पटेलला यश मिळाले. धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून जॅक फ्रेजर-मागेर्कने १८ चेंडूत ६५ धावा केल्या. मॅकगर्कने या मोसमातील दुसरे अर्धशतक झळकावले. तर कर्णधार ऋषभ पंतने ४४ आणि अभिषेक पोरेलने २२ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. एसआरएचच्या टी नटराजनने ४ बळी घेतले. नितीश रेड्डी आणि मयंक मार्कंडे यांना २ बळी मिळाले.

दिल्लीने सातत्याने विकेट गमावल्या आणि आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह सनरायझर्स हैदराबाद संघाने केकेआरला मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. तर दिल्ली संघ एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-20T18:42:52Z dg43tfdfdgfd