INDIA WORLD CHAMPION: सूर्याची कॅच, बुमराह-पंड्या-अर्शदीपची कमाल, हे ५ क्षण ठरले भारतासाठी टर्निंग पॉईंट

बारबाडोस: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या विश्व चषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने अभुतपूर्व असा विजय मिळवला. प्रत्येक ओव्हरमध्ये, प्रत्येक बॉलनंतर या सामन्यातील रोमांच आणखी वाढत चालला होता. भारताने द. आफ्रिकेला १७७ धावांचं आव्हान दिलं होतं. पण, ते आव्हान पूर्ण करु शकले नाही आणि भारताने द. आफ्रिकेवर दमदार विजय मिळवला.

मात्र, हा विजय असा सहजासहजी आलेला नाही. या सामन्यादरम्यान अनेक असे क्षण आले जेव्हा असं वाटलं की यंदाही विश्वचषक भारताच्या हातातून निसटणार, पण अखेर भारतीय खेळाडूंनी जादू केली आणि विश्व चषक भारताकडे आला. या सामन्यत असे पाच महत्त्वाचे क्षण आले ज्याने मॅच फिरली आणि भारत विश्वविजेता झाला.

कोहली-अक्षरची पार्टनरशीप

टॉस जिंकल्यानंतर भारताने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एक वेळ अशी आली जेव्हा भारतीय संघाने ३४ धावांवर ३ विकेट गमावल्या होत्या. तेव्हा असं वाटलेलं की भारत द. आफ्रिकेसमोर जास्त मोठं आव्हान ठेवू शकणार नाही. पण, पाचव्या क्रमांकावर खेळायला अक्षर पटेलला पाठवलं आणि त्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला. विराट कोहली आणि अक्षर पटेल या जोडीने ७२ धावांची पार्टनरशीप केली आणि भारताचा स्कोअर १७६ पर्यंत पोहोचवण्यात मोठा वाटा उचलला. कोहलीने ४८ चेंडून अर्धशतक केलं. त्याने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या, तर अक्षरने ३१ चेंडूत ४७ धावा केल्या. त्यानंतर भारताने १७६ धावा ७ बाद असा स्कोअर उभा केला.

क्लासेनची विकेट सर्वात मोठा टर्निंग पॉईंट

हेनरिक क्लासेनला मैदानात खेळताना पाहून प्रत्येक भारतीयाचं टेन्शन वाढलं होतं. क्लासेनने २७ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याने ५ षटकार आणि २ चौकार लगावले. त्यामुळे द. आफ्रिका संघ हा १५ व्या षटकात ४ बाद १४७ चा स्कोअर गाठला. तेव्हा हा सामना हातातून गेला असं वाटत होतं. ३० चेंडून ३० धावा हव्या होत्या. तेव्हा बुमराहने १६ व्या षटकात फक्त ४ धावा दिल्या, त्यानंतर १७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने क्लासेनची विकेट घेतली आणि सामना फिरला.

Pure Joy and Emotions 🥹 🥳#T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/WBrLOoEbd4

— BCCI (@BCCI) June 29, 2024 ]]>

५ षटकात पंड्या-बुमराह-अर्शदीपचा जलवा

क्लासेनची विकेट गेल्यानंतर पंड्या, बुमराह आणि अर्शदीपने द. आफ्रिकेवर दबाव आणला. पंड्याने १७ व्या षटकात १ विकेट घेतली आणि ४ धावा दिल्या. त्यानंतर १८ वं षटक बुमराहने टालला आणि त्याने मार्को जानसेनची विकेट घेतली. त्यानंतर १९ व्या षटकातही अर्शदीपने फक्त ४ धावा दिल्या आणि भारताला विजयाकडे नेलं.

पंड्याचं अखेरचं षटक

त्यानंतर अखरेच्या षटकात द. आफ्रिकेला जिंकण्यासाठी १६ धावा पाहिजे होत्या. पण, पंड्याने कमाल केली आणि अखेरच्या षटकातही त्याने विकेट घेतली. त्याने डेव्हिड मिलरची विकेट घेतली आणि भारत चॅम्पियन झाली.

सूर्याची ती कॅच अन् भारत जिंकला

विश्व चषकाचा हा सामना खासकरुन सूर्यकुमार यादवच्या कॅचमुळे अविस्मरणीय ठरला. पंड्याने जेव्हा अखेरचं षटक टाकायला आला तेव्हा मिलर २१ धावासह खेळत होता. मिलरने पहिल्याच चेंडूवर लॉन्ग ऑफवर बाऊंड्रीकडे हवाई शॉट मारला. पण, सूर्य कुमारने एक अविश्वसनीय कॅच पकडला. सूर्याने बाऊंड्रीच्या आत चेंडू झेलला, पण त्याला माहिती होतं की तो बाऊंड्रीच्या बाहेर जाणार आहे, तर त्याने चेंडू हवेत फेकला आणि बाऊंड्रीच्या आत येत पुन्हा कॅच केला. ज्याही व्यक्तीने हा क्षण पाहिला तो आयुष्यात कधी हे विसरणार नाही. या कॅचने भारताला विजयाच्या जवळ नेलं.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-30T04:30:11Z dg43tfdfdgfd