RCB VS LSG : मयांक यादवकडून KGF चा खात्मा; घरच्या मैदानावर 28 धावांनी लोळवलं

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएल 2024 चा 15 वा सामना खेळवला गेला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊने बंगळुरूचा 28 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात लखनऊचा वेगवान गोलंदाज मयांक यादवनं (Mayank Yadav) कहर केला. 4 ओव्हरमध्ये फक्त 14 रन देऊन मयांकने 3 महत्त्वाचे गडी बाद केले. तर क्विंटन डि कॉकने (Quinton de Kock) 81 धावांची मॅचविनिंग खेळी केली. त्यामुळे आरसीबीला पुन्हा घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनऊने 181 धावा उभारल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना लखनऊला केवळ 153 धावा करता आल्या.

लखनऊने दिलेल्या 182 धावांचं आव्हान पार करताना आरसीबीने दमदार सुरूवात केली. किंग विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिसने 4 ओव्हरमध्ये 40 धावा केल्या. मात्र, विराट कोहलीची विकेट गेली अन् आरसीबीला पुन्हा घरघर लागली. मॅक्सवेल आणि कॅमरून ग्रीनला मिडल ऑर्डरमध्ये चांगली फलंदाजी करता आली नाही. तर अनूज रावत देखील फेल ठरला. त्याने 21 बॉलमध्ये 11 च धाव्या केल्या. त्यानंतर महिपाल लोमरोर याने 13 बॉलमध्ये 33 धावा करत सामन्यात कमबॅक केलं. पण तोपर्यंत आरसीबीची फलंदाजी ढेपाळली होती. मोहम्मद सिराजने अखेरीस बॉलला आस्मान दाखवलं पण आरसीबीने तोपर्यंत गुडघे टेकवले होते. अखेर लखनऊने सामना 28 धावांनी जिंकली.

त्यापूर्वी, लखनऊ सुपर जाएंटसची फलंदाजी एका चांगल्या सुरूवातीनंतर डगमगली. सलामीवीर क्विंटन डि कॉकने 56 बॉलमध्ये 8 फोर अन् 5 सिक्सच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. तर निकोलस पूरनने ताबडतोब 40 धावांची इनिंग खेळत लखनऊला 181 धावांपर्यंत पोहोचवलं. बंगळुरूकडून गोलंदाजीत ग्लेन मॅक्सवेलने सर्वात जास्त 2, तर टॉप्ले, दयाल आणि सिराज प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

आरसीबीची प्लेईंग 11 - विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), कॅमरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), रीस टॉपले, मायंक दागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

लखनऊची प्लेईंग 11 - क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पाडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पुरन, आयुष बदोनी, कृणाल पांडया, रवि बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव.

2024-04-02T17:54:23Z dg43tfdfdgfd