T20 WORLD CUP 2024: पाकिस्तानचा अहंकार मोडला नेपाळच्या गोलंदाजाने, खेळाडूचा विक्रमी रेकॉर्ड

किंग्सटाउन : नेपाळचा फिरकी गोलंदाज आणि माजी कर्णधार संदीप लामिछाने याने सोमवारी, १७ मे रोजी बांग्लादेशविरुद्ध उत्तम कामगिरी करत एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. त्याने बांग्लादेश संघाला १९.३ षटकात १०६ धावांतच गार केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मागील सामन्यतही त्याने आपल्या खेळाने सर्वांना आचंबित केले होते. बांग्लादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात संदीप लामिछाने याने ४ षटकात १७ धावा देत ३ गडी बाद केले. याच बरोबर संदीप लामिछाने याने पाकिस्तानचा जलद गोलंदाज हरिस रौफचा विक्रम मोडला आहे.

पाकिस्तानचा जलद गोलंदाज हरिस रौफ याच्या नावावर टी-२० मध्ये ७१ सामन्यात १०० विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड होता. संदीप लामिछाने याने पाकिस्तानचा जलद गोलंदाज हरिस रौफचा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद १०० विकेट्स घेणारा लामिछाने हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान आहे.

सोमवारी, १७ मे रोजी बांग्लादेश विरुद्ध नेपाळ असा सामना सेंट व्हिन्सेंटमध्ये झाला. ज्यात बांग्लादेशचा जलद गोलंदाज तंजीम हसन साकिब याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याने चार षटकात १० धावा देत ४ गडी बाद केले. बांग्लादेशची फलंदाजी जरी कमकुवत ठरली तरी गोलंदाजांमुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुपर-८ मध्ये बांग्लादेशने आपली जागा पक्की केली. बांग्लादेशने नेपाळला २१ धावांनी पराभूत केले. नेपाळने लक्ष्याचा पाठलाग करत १९.२ षटकात ८५ धावा करत सर्व गडी गमावले.

बांग्लादेश संघाकडून तंजीम हसन साकिब याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने चार षटकात १० धावा देत ४ गडी बाद केले. या व्यतिरिक्त मुस्तफिजुर रहमान याने सात धावा देत तीन गडी बाद केले आणि शाकिब अल हसनने नऊ धावा देत २ गडी बाद केले. पहिल्यांदाच बांग्लादेशने टी-२० विश्वचषक स्पर्धेत तीन सामने जिंकले आहेत. तंजीमच्या भेदक गोलंदाजीमुळे नेपाळची फलंदाजांची वरची फळी कमजोर झाली.

नेपाळची एकवेळ अवस्था ५ बाद २६ धावा अशी होती. पण कुशल मल्ला (२७) आणि दीपेंद्र सिंह ऐरी (२५) यांच्या ५२ धावांच्या भागिदारीमुळे संघाला एक आशा मिळाली. मुस्तफिजुरने कुशलला बाद करत दोघांची भागिदारी तोडली. त्यानंतर त्याने दिपेंद्रला बाद केले ज्याच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९ चेंडूवर अर्धशतक बनवण्याचा विक्रम आहे.

बांग्लादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने याने ४ षटकात १७ धावा देत ३ गडी बाद केले. याच बरोबर लामिछाने याने आपल्या नावावर एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला. संदीप हा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वात जलद १०० विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत राशिद खान पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानी हारिस रौफ होता पण संदीप याने आता त्या जागेवर आपले स्थान मिळवले आहे. त्यामुळे हरिस रौफ आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. संदीप लामिछानेवर एकेकाळी बलात्काराचा आरोप होता ज्यात त्याला आठ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद १०० विकेट्स घेणारे गोलंदाज

राशिद खान (अफगाणिस्तान) - ५३ सामने

संदीप लामिछाने (नेपाळ) - ५४ सामने

हरिस रौफ (पाकिस्तान) - ७१ सामने

मार्क अडायर (आयर्लंड) - ७२ सामने

बिलाल खान (ओमान) - ७२ सामने

लसिथ मलिंगा (श्रीलंका) - ७६ सामने

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-17T14:27:41Z dg43tfdfdgfd