WI VS SA: दक्षिण आफ्रिकेने विजयासोबत गाठली सेमी फायनल फेरी; पराभवानंतर वेस्ट इंडिज वर्ल्डकपमधून आऊट

सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम: यजमान वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० वर्ल्डकपमधील सुपर-८चा शेवटचा सामना रंगला. सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा सामना रंगला असून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला १३५ धावांवरच रोखले. पावसामुळे सुरुवातीला सामना थोडा वेळ थांबवण्यात आला नंतर सामना सुरु झाल्यानंतर डीएलएस पद्धतीनुसार दक्षिण आफ्रिकेला १२३ धावांचे लक्ष्य देण्यात आले जे दक्षिण आफ्रिकेने १६.१ इतक्या षटकातच पूर्ण केले.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वेस्ट इंडिज सामना पावसामुळे थांबवण्यात आला त्याआधी दक्षिण आफ्रिकेने १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दोन षटकांत २ बाद १५ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा संघ आधी ८ विकेट्सवर १३५ धावा करू शकला. पावसामुळे विलंबित झालेला सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर डीएलएसनुसार दक्षिण आफ्रिकेला १७ षटकांत १२३ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले जे दक्षिण आफ्रिकेने सहज पूर्ण केले.

दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनल फेरी गाठली

लक्ष्याचा पाठलाग करताना अल्झारी जोसेफने कर्णधार एडन मार्कराम १८ आणि हेनरिक क्लासेन २२ धावांवर बाद केले. ट्रिस्टन स्टबला २९ आणि डेव्हिड मिलरला ४ धावांवर रोस्टन चेसने बाद केले. यानंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात केशव महाराज २ धावांवर बाद झाल्यावर दक्षिण आफ्रिका शरणागती पत्करेल असे वाटत होते. मात्र यानंतर कगिसो रबाडा आणि मार्को जॅनसेन यांनी जबाबदारी स्वीकारून संघाला सेमी फायनल फेरी पोहोचवले. मार्कोने २१ धावांची नाबाद खेळी केली तर रबाडा ५ धावांवर नाबाद राहिला. गोलंदाजी करताना गंभीर दुखापत होऊनही संघासाठी हे दोघे वेळेवर धावून आले.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही पराक्रम गाजवला. तबरेझ शम्सीने संघाकडून सर्वाधिक ३ बळी काढले तर कगिसो रबाडा,केशव महाराज, एडन मार्कराम ऑनरिक नॉर्खिया यांनी प्रत्येकी १-१-१-१ बाली काढले. दक्षिण आफ्रिकेने या दमदार विजयासोबतच सेमी फायनल फेरी गाठली. अशाप्रकारे इंग्लंडनंतर आता सेमी फायनल फेरी गाठणारा ग्रुप-२ मधील दुसरा दक्षिण आफ्रिका ठरला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-24T05:37:02Z dg43tfdfdgfd