IND VS AFG: भारतासाठी मोठे आव्हान; सुपर-८ मध्ये टीम इंडियाला 'ही' एक चूक महागात पडू शकते

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर फलंदाजांना चांगली कामगिरी दाखवता आली. भारतीय फलंदाजांनापैकी आतापर्यंत केवळ ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव या दोन फलंदाजांनीच उल्लेखनीय कामगिरी केली. या वर्ल्डकपमध्ये गोलंदाजांनी मात्र दमदार कामगिरी केली. अधिकतर संघ गोलंदाजांच्या पराक्रमामुळेच सुपर-८ ची फेरी गाठू शकले आहेत पण आता सुपर-८ मध्ये ही चूक महागात पडू शकते

भारताने दमदार कामगिरी करत सुपर-८ फेरी गाठली आहे. सुपर-८ मध्ये भारताला अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी सामने खेळायचे आहे. १९ जूनला बार्बाडोस येथे भारतविरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारताला केवळ गोलंदाजाच्या जीवावर सामना खेळायला मैदानात उतरून चालणार नाही फलंदाजांनाही आप आपली कामगिरी सादर करावी लागणार आहे. सुपर-८ मध्ये भारताला अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रलियासमोर सामने खेळायचे आहेत आणि अफगाणिस्तानचे फलंदाज आता चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे.

या त्रिकुटापासून भारताला धोका

अफगाणिस्तान हा असा संघ आहे जो कधीही बाजी पलटवू शकतो. याआधी अफगाणिस्तानने भारताला एकदा अगदी सुपर ओव्हरच्या थरारपर्यंत पोहोचवले होते. अफगाणिस्तानकडे आधी केवळ दर्जेदार फिरकीपटू असायचे परंतु आता दमदार फलंदाजही आहेत. भारताला रशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब-उर-रहमान या त्रिकुटापासून सावध राहून खेळावे लागणार आहे.

भारताला ग्रुप-१ मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नंतर ऑस्ट्रेलियाशी सामना करायचा आहे. हा सामना बार्बाडोस, अँटिग्वा आणि सेंट लुसिया अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला सामना गमावला तर पुढील दोन सामने हे अटीतटीचे होतील. ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ सुपर-८ मध्ये पोहोचला आहे.

कर्णधार राशिद खानच्या आशा डावखुरा वेगवान गोलंदाज फझलहक फारुकीवर अवलंबून असतील, ज्याने आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक १२ बळी घेतले आहेत. फलंदाजांमध्ये रहमानुल्ला गुरबाह आणि इब्राहिम झद्रान यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्मही भारतासाठी चिंतेचा विषय आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-20T07:32:38Z dg43tfdfdgfd